Posts

माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 16 डिसेंबर 2025

  माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 16 डिसेंबर 2025 प्रश्न 1 - महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे   ? ➡️  अहिल्यानगर ( पूर्वीचे नाव अहमदनगर ) प्रश्न 2 - सोलापूर जिल्ह्यात  क्षेत्रफळाने सर्वात मोठा   तालुका आहे ? ➡️  करमाळा तालुका 1609.7 चौ. कि. मी.  प्रश्न 3 -  सोलापूर जिल्ह्यात  क्षेत्रफळाने सर्वात लहान  तालुका आहे ? ➡️ उत्तर सोलापूर  तालुका  736.3  चौ. कि. मी. प्रश्न 4 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात मोठ्या पुत्राचे नाव काय होते  ? ➡️  छत्रपती संभाजी महाराज  प्रश्न 5 - सर्वात लहान पहिली संयुक्त संख्या कोणती ? ➡️  4  ( चार ) जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 15 डिसेंबर 2025

  माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 15 डिसेंबर 2025 प्रश्न 1 - महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे   ? ➡️ नागपुर  प्रश्न 2 - सोलापूर जिल्ह्यात कोण कोणते  तालुके आहेत ? ➡️ 11 तालुके - 1) अक्कलकोट, 2) मोहोळ, 3) बार्शी, 4) माढा , 5) करमाळा, 6) माळशिरस, 7) पंढरपूर, 8) सांगोला, 9) मंगळवेढा, 10) उत्तर सोलापूर, 11) दक्षिण सोलापूर . प्रश्न 3 - महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे  ? ➡️ गोदावरी  प्रश्न 4 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी  कोण होत्या ? ➡️ महाराणी सईबाई  प्रश्न 5 - सर्वात पहिली मूळ संख्या कोणती ? ➡️ 2 ( दोन ) जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 14 डिसेंबर 2025

  माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 14 डिसेंबर 2025 प्रश्न 1 - महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे   ? ➡️ मुंबई  प्रश्न 2 - सोलापूर जिल्ह्यात किती तालुके आहेत ? ➡️ 11 (अकरा ) प्रश्न 3 - महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे  ? ➡️ कळसूबाई शिखर  प्रश्न 4 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री कोण होत्या ? ➡️ राष्ट्रामाता जिजाबाई   प्रश्न 5 - दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती ? ➡️ 99 ( नव्याण्णव ) जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 13 डिसेंबर 2025

  माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 13  डिसेंबर 2025 प्रश्न 1 - आपल्या जिल्ह्याचे शेजारील जिल्हे कोणते आहेत  ? ➡️ पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर, धाराशीव आणि कर्नाटक राज्यातील जिल्हये.  प्रश्न 2 - छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला होता ? ➡️ शिवनेरी किल्ल्यावर  प्रश्न 3 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते ? ➡️ शहाजीराजे भोसले  प्रश्न 4 - पावसाळा ऋतु कोणत्या महिन्यात असतो ? ➡️ जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर  प्रश्न 5 - दोन अंकी सर्वात लहान संख्या कोणती ? ➡️ 10 ( दहा ) जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 12 डिसेंबर 2025

  माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 12  डिसेंबर 2025 प्रश्न 1 - आपल्या जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे ? ➡️ सोलापूर प्रश्न 2 - आपल्या जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणते आहे ? ➡️ पंढरपूर सोलापूर आणि अक्कलकोट  प्रश्न 3 - आपल्या जिल्ह्यात प्रसिद्ध देऊळ कोणते आहेत? ➡️ पंढरपूर - विठ्ठल रुक्मिणी ,  सोलापूर- श्री. सिद्धेश्वर महाराज , अक्कलकोट- श्री. स्वामी समर्थ प्रश्न 4 - आपल्या जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे ? ➡️ ज्वारी  प्रश्न 5 - आपल्या जिल्ह्यातून इतर ठिकाणी जाण्यासाठी कोणती वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत ? ➡️ रस्ते वाहतूक ,  रेल्वे , विमानसेवा  जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 11 डिसेंबर 2025

  माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 11 डिसेंबर 2025 प्रश्न 1 - आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO ) कोण आहेत ? ➡️ मा कुलदीप जंगम साहेब  प्रश्न 2 - आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कोण आहेत ? ➡️ मा. कादर शेख साहेब  प्रश्न 3 - आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? ➡️ मा. जयकुमार गोरे साहेब  प्रश्न 4 - आपल्या जिल्ह्याचे पालक मंत्री यांच्या कडे कोणते महाराष्ट्र शासनाच्या मंत्री मंडळातील कोणते खाते आहे ? ➡️ ग्राम विकास विभाग  प्रश्न 5 - आपल्या जिल्ह्यातून मोठे धरण कोणते व कोणत्या नदीवर आहे ? ➡️ उजनी धरण - भीमा नदीवर  आहे  जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 10 डिसेंबर 2025

  माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 10 डिसेंबर 2025 प्रश्न 1 - आपल्या जिल्ह्याचे नाव काय आहे? ➡️ सोलापूर  प्रश्न 2 - आपल्या जिल्ह्याचे खासदार कोण आहेत ? ➡️ मा. प्रणितीताई शिंदे प्रश्न 3 - आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? ➡️ मा कुमार आशीर्वाद साहेब  प्रश्न 4 - आपल्या जिल्ह्यातून कोणती मोठी नदी वाहते आहे ? ➡️ भीमा प्रश्न 5 - आपल्या जिल्ह्यातून  कोणकोणत्या नद्या वाहत आहेत ? ➡️ भीमा, सीना, बोरी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱